कामगार मंत्री आकाश फुंडकरसह कुटुंबाने रांगेत उभे राहून केले मतदान 

खामगाव : लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. या अनुषंगाने  नगरपालिका निवडणुकीमध्ये खामगाव नगरपालिकेसाठी आज दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. दरम्यान निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर तसेच खामगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवार अपर्णा सागर फुंडकर यांनी सहपरिवार येथील चांदे कॉलनी भागातील मतदान केंद्रावर नागरिकांसोबत रांगेत उभे राहून मतदान केले.

        खामगाव शहरातील नगरपालिकेसाठी 79 मतदान केंद्रावर सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 20 ते 22 टक्के मतदान पार पडले होते. सर्वच मतदान केंद्रांवर उमेदवारांकडून तसेच पक्षांकडून मतदारांना वार्डा वार्डात फिरून नागरिकांना मतदान करण्यासाठी विनंती करण्यात येत होती. तर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आन करण्याकरिता वाहनांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली होती. दुपारी दोन वाजेनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »