जालना : ‘गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत येणार नाही, असे कधी घडले नाही आणि घडणारही नाही’! या वाक्याचा प्रत्यय आला तो जालना जिल्ह्यात. वर्षाभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २६ फेब्रुवारीला सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

जालना : ‘गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत येणार नाही, असे कधी घडले नाही आणि घडणारही नाही’! या वाक्याचा प्रत्यय आला तो जालना जिल्ह्यात. वर्षाभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २६ फेब्रुवारीला सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. पोलीस खात्यातील ‘अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट’ च्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
जालना पोलीस स्टेशन हद्दीत ५ मार्च २०२४ मध्ये या धक्कादायक घटनेची नोंद झाली. तेव्हा ‘त्या’ अल्पवयीन मुलीचे वय होते १३ वर्ष ६ महिने. तिच्या घराजवळ सचिन नावाचा २१ वर्षीय तरुण नेहमी फेरफटका मारण्यासाठी येत होता. सचिन आणि पीडित अल्पवयीन मुलगी या दोघांची तेव्हा चांगली ओळख झाली. दोघेही मित्र बनले आणि पुढे मैत्रीचे पर्यावसान झाले ते प्रेमात. ‘प्रेम आंधळ असत ‘ असे म्हणतात. त्याप्रमाणे पीडिता प्रेमाच्या काळोखात हरवून गेली. अखेर सचिनने तिला पळवून नेल्याचे ठरविले. लग्नाचे आमिष दाखविले आणि तो पीडितेला घेवून फरार झाला. तेव्हा, पीडिता कुठे गेली? असा गंभीर प्रश्न तिच्या घरंच्यासमोर पडला होता. बहुतेक सचिन आणि पीडितेच्या ‘कथित’ नात्याविषयी पिडीतेच्या घरच्यांना माहिती झाले होते. कारण, दोन दिवसांनी जालना पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. ‘त्या’ तक्रारीत पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे सचिनने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले, असे म्हटले होते. त्यावरून पोलिसांनी सचिन विरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
अनैतिक मानवी वाहतूकप्रतिबंध कक्षाकडे गुन्हा वर्ग..
घटनेला एक वर्ष पूर्ण झाली, तरी पीडिता आणि आरोपी सचिन या दोघांचा थांग पत्ता लागला नाही. या प्रकरणात पोलिसांचे तपासचक्र मात्र वेगाने फिरतच होते. तेव्हढ्यात सदर गुन्हयाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलीस अधिक्षक अजय बंसल यांच्या आदेशानुसार ७ जानेवारी २०२५ ला अनैतिक मानवी वाहतूकप्रतिबंध कक्षाकडे गुन्हा वर्ग करण्यात आला.
असा लागला शोध..
विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासाला वेग दिला होता. त्यानुसार, तंत्रज्ञानाच्या आधारे आरोपीचे ‘लोकेशन’ मिळून आले. सचिन आणि पीडिता हे दोघे वर्षभरापासून सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात उसतोडीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी धाड टाकून सचिन आणि पीडितेला ताब्यात घेतले.
कामगिरी पथक..
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव (स्थागुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी प्रियंका तुपे, पोउपनि रविंद्र जोशी, सपोउपनि संजय गवळी, पोहेकॉ सागर बावीस्कर (स्थागुशा),महिला अंमलदार पुष्पा खरटमल, संगिता चव्हाण, आरती साबळे, रेणुका राठोड व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केली आहे.