जालना : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर ( सीएमआयए ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सीएमआयए 2025’ पुरस्कारांमध्ये जालना येथील कालिका स्टील कंपनीला ‘सस्टेनेबिलिटी व पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रविवार, 27 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे संचालक घनश्याम गोयल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

विनोद काळे / जालना : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर ( सीएमआयए ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सीएमआयए 2025’ पुरस्कारांमध्ये जालना येथील कालिका स्टील कंपनीला ‘सस्टेनेबिलिटी व पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रविवार, 27 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे संचालक घनश्याम गोयल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
भारतातील एक अग्रगण्य स्टील उत्पादक कंपनी असलेल्या ‘कालिका स्टील्स’ला ‘सीएमआयए 2025’ पुरस्कारांमध्ये ‘सस्टेनेबिलिटी व पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन’ या श्रेणीत गौरवण्यात आले. पर्यावरण संरक्षणासाठी ‘शून्य निःसारण’ धोरण ‘कालिका स्टील’ ने अवलंबले आहे. याबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.
मराठवाडा क्षेत्रातील उत्पादन उद्योगातील सदस्य कंपन्यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी विविध पुरस्कार देण्यात आले. यामध्ये पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन निर्मिती करण्यात कालिका स्टीलने अव्वल मानांकन मिळवले. यासाठी १५० हून अधिक अर्जदारांची सखोल तपासणी व मुलाखतीनंतर पाच तज्ज्ञांच्या स्वतंत्र परीक्षक समितीने कालिका स्टील्सची निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मंत्री अतुल सावे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कालिका स्टीलचा गौरव करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्विकारताना कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल, अनुज बन्सल, यश गोयल उपस्थित होते.
दोन दशकांची वाटचाल
जालना हे शहर स्टील उद्योगासाठी भारतात प्रसिद्ध आहे. येथून देशविदेशात स्टील उत्पादन निर्यात केले जाते. त्यामुळेच ‘स्टील हब’ म्हणूनही जालना शहराचा उल्लेख केला जातो. ‘कालिका स्टील’ कंपनीचा दोन दशकांहून अधिक काळ उत्पादन उत्कृष्टतेचा वारसा जपलेला आहे. या कंपनीने पर्यावरण संरक्षणासाठी ‘शून्य निःसारण’ धोरण अवलंबले आहे. त्यांच्या पर्यावरणीय व सामाजिक बांधिलकीच्या कार्याला मिळालेल्या या सन्मानामुळे औद्योगिक क्षेत्रात कौतुक केले जात आहे.