Jalna constituency vote counting: विधानसभेच्या निवडणुकीत जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार आघाडी घेतली आहे.
विनोद काळे/ जालना : विधानसभेच्या निवडणुकीत जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या पाचही उमेदवारांना महायुतीच्या उमेदवारांनी मागे टाकल्याचे दिसत आहे.
परतूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आठवी फेरी अखेर बबन लोणीकर 20504 घेऊन 2026 मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे शिवसेना उद्भव ठाकरे गटाचे उमेदवार आसाराम बोराडे यांना 15854 मते पडली. कॉंग्रेस चे बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांनी 18778 मते घेतली.
जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी 11 फेरीत देखील आघाडी कायम ठेवली आहे . 49866 मते घेऊन कॉंग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना 34 864 मते मिळाली. तर कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार अब्दुल हाफिज यांना 8528 मते मिळाली.
घनसावंगी येथे शिंदे सेनेचे हिकमत उढाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांना पिछाडीवर टाकलेले आहे. उढाण यांना पाचवा फेरी अखेर 20508 मते मिळाली. राजेश टोपे यांना 17 570 मते तर भाजपाचे बंडखोर उमेदवार सतीश घाटगे यांनी 4686 मते घेतली. हिकमत उढाण 2938 मतांनी आघाडीवर आहेत.
बदनापूर मध्ये भाजपाचे नारायण कुचे यांनी आघाडी कायम ठेवत 32155 मत घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांना पिछाडीवर ठेवलेले आहे. चौधरी यांना 21304 मते मिळाली आहेत. कुचे यांनी 10851 मतांची आघाडी घेतली आहे.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपाचे संतोष दानवे यांनी देखील आघाडी कायम ठेवली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांना मागे सोडलेले आहे. आठव्या फेरी अखेर संतोष दानवे यांना 8442 मतांची आघाडी मिळाली आहे. पाचही विधानसभा मतदारसंघात आता पर्यंतच्या निकाला नुसार महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे.