Jalna constituency counting: विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी राज्यभरात महायुतीची जादू चालल्याचे दिसून येत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर, परतूर येथील उमेदवार अनुक्रमे संतोष दानवे, नारायण कुचे, बबनराव लोणीकर या उमेदवारांनी आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या फेर्यामध्ये आघाडी कायम ठेवली आहे.
विनोद काळे/ जालना : विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी राज्यभरात महायुतीची जादू चालल्याचे दिसून येत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर, परतूर येथील उमेदवार अनुक्रमे संतोष दानवे, नारायण कुचे, बबनराव लोणीकर या उमेदवारांनी आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या फेर्यामध्ये आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळे हे तिन्ही उमेदवार विजयाची हॅटट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून आले आहे.
भोकरदन मतदारसंघात भाजपाचे संतोष दानवे यांनी सलग तिसर्या विजयाकडे वाटचाल सुरू केल्याचे आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून दिसून येत आहे. अकराव्या फेरी अखेर दानवे यांनी 15 हजार 515 मतांची आघाडी घेतली आहे . तर त्यांच्याविरुद्ध सलग तिसर्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत दानवे यांना पराभवाच्या छायेत आहेत.
परतूर मतदारसंघात बबन राव लोणीकर यांनी 18 व्या फेरीत 46 हजार 557 मते घेऊन 1148 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांना 45 हजार 409 मते मिळाली आहेत. बदनापुरात भाजपाचे नारायण कुचे यांनी देखील 22 हजारांवर मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुढच्या काही फेर्यामध्ये ही आघाडी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिघांना हॅटट्रिकची संधी मिळाली आहे.