Internal controversy sparks in Grand Alliance : मला कुणाचीही साथ नव्हती, महायुतीमधील अनेक नेते माझ्यासोबत नव्हते. कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढली आणि जिंकलो. इतकेच नाही तर जळगाव जामोदचे आ. संजय कुटे यांनी माझ्याविरोधात उमेदवाराचे तिकीट फायनल केल्याचा गौप्यस्फोट आ. संजय गायकवाड यांनी केला. बुलढाण्यातील एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
बुलढाणा : मला कुणाचीही साथ नव्हती, महायुतीमधील अनेक नेते माझ्यासोबत नव्हते. कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढली आणि जिंकलो. इतकेच नाही तर जळगाव जामोदचे आ. संजय कुटे यांनी माझ्याविरोधात उमेदवाराचे तिकीट फायनल केल्याचा गौप्यस्फोट आ. संजय गायकवाड यांनी केला. बुलढाण्यातील एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
बुलढाणा विधानसभेचे निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यामध्ये, (शिंदेसेना) महायुतीचे संजय गायकवाड यांचा अवघ्या 841 मतांनी निसटता विजय झाला. दरम्यान, निकालानंतर माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या प्रतिक्रियेत आ. संजय गायकवाड म्हणाले होते की, मी ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्यांमुळे जिंकलो. त्यानंतर देखील बुलढाणा येथे एका जाहीर कार्यक्रमात गायकवाड यांनी महायुतीतील सहकारी नेत्यांवर निशाणा साधला. जळगाव जामोदचे आ. संजय कुटे यांनी माझ्या विरोधात उमेदवाराचे तिकीट फायनल केल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर, निवडणूक काळात महायुतीमधील अनेक नेते माझ्यासोबत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आ. गायकवाड यांनी केलेल्या आरोपानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात महायुतीचे सहा उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीचे वर्चस्व असताना त्यात अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
केंद्रीयमंत्री जाधव यांचीही साथ नव्हती
आ. गायकवाड यांनी ना. प्रतापराव जाधव यांना आपले राजकीय गुरु मानले आहे. स्वतः आ. गायकवाड यांनी अनेकवेळा असे सांगितले आहे. मात्र, निवडणूक काळात आपले केंद्रीय मंत्री हे सोबत नसल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली.