dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय!

कोलोंबो : भारताने पाकिस्तानवर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 8-1 अशी आघाडी घेतली आहे.  भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानला हे आव्हान  गाठता आलं नाही.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने रचला इतिहास : पाकिस्तानला 61 धावांनी नमवलं

कोलोंबो : भारताने पाकिस्तानवर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 8-1 अशी आघाडी घेतली आहे.  भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानला हे आव्हान  गाठता आलं नाही. पाकिस्तानच्या विकेट धडाधड विकेट पडल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ विजयापासून दूर गेला. या विजयासह भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे.   भारताने पाकिस्तानला दिलेल्या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. भारताने सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये पाकिस्तानचे 3 फलंदाज बाद केले. त्यानंतर पाकिस्तानचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. हार्दिक पंड्याने भारतला ब्रेक थ्रू दिला होता. हार्दिकनेच शेवटी विकेट घेत भारताला मोठा विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 18 षटकांमध्ये सर्वबाद 114 धावांपर्यंतच मजल मारली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top