छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण रविवार, 27 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य,कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सतिष चव्हाण, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव यांचीही यावेळी उपस्थिती होती. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. अरविंद गायकवाड यांनी मान्यवरांना यंत्रप्रणालीची माहिती दिली. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणाचेही लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.