dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आम्ही गुन्हेगार असू तर, आम्हाला जेलमध्ये टाका; भोकरदनला सरपंच मंगेश साबळेंचे आंदोलन

भोकरदन : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ, सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, 31 डिसेंबर रोजी भोकरदनमध्ये अभूतपूर्व ‘जेलभरो’ आंदोलन करण्यात आले. हातात दोरखंड आणि डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधून ‘आरोपी’च्या वेशभूषेत आंदोलक रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या आंदोलनाने वेधून घेतले होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दुपारी आंदोलनाला सुरुवात झाली. ज्या १२ जणांवर गुन्हे दाखल झाले होते, त्यांनी स्वतःला ‘गंभीर गुन्हेगार’ दर्शवणारी वेशभूषा केली होती. डोळ्यांवर काळ्या पट्ट्या आणि हातांना दोरखंड बांधलेल्या अवस्थेत या आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत तब्बल दीड किलोमीटरचे अंतर आंदोलकांनी पायी पार केले. यावेळी ‘शेतकरी क्रांतीचा विजय असो’, ‘दडपशाही करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शेकडो शेतकरी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर धडक दिल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या अभिनव आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेता, तहसील कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन सम्राट” अशी ओळख असलेल्या मंगेश साबळेंनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीने प्रशासनाला धारेवर धरल्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

शेतकऱ्यांचे हक्क मागणे हा गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगारच : मंगेश साबळे

यावेळी प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढताना सरपंच मंगेश साबळे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर आणि गोठे मागणे जर प्रशासनाच्या नजरेत गुन्हा असेल, तर आम्ही हे गुन्हे वारंवार करू. आम्हाला गुन्हेगार ठरवून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. जर आम्ही गुन्हेगार आहोत, तर प्रशासनाने आम्हाला तत्काळ जेलमध्ये टाकावे. त्यांनी सरकारला इशारा दिला की, खोट्या गुन्ह्यांनी शेतकरी डगमगणार नाही, उलट ही लढाई अधिक तीव्र होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top