पत्नीच्या भेटीसाठी निघालेल्या पतीचा दुचाकी अपघातात मृत्यू : डोणगाव नजीकच्या विठ्ठलवाडी येथील घटना 

डोणगाव : गर्भवती पत्नीच्या भेटीसाठी निघालेल्या 30 वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना डोणगाव नजीक विठ्ठलवाडी येथे घडली.  नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला, अशी प्राथमिक माहिती आहे.  रुपेश दशरथ करवते, रा. डोणगाव असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. 

  रुपेश हा 20 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने अकोला जिल्ह्यातील नवेगाव येथे गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी निघाला होता. दरम्यान, डोणगावपासून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी गावाजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्याकडेला असलेल्या दगडाला धडक होवून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली,  त्यात त्याचा मृत्यू झाला.  डोणगाव येथील उत्कृष्ट व्हिडिओ एडिटर म्हणून रुपेश करवतेची ओळख होती.  त्याचे वडील मूळ अकोला जिल्ह्यातील निम्मी गावचे रहिवासी आहेत. परंतु, मेहकर तालुक्यात प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असल्याने गेली अनेक वर्ष ते डोणगाव येथेच राहतात. रुपेशच्या अकाली निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »