बुलढाणाः जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या भिंगारा, चाळीसटापरी व गोमाळ येथील आदिवासी बांधवांनी जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या कॅबिनसमोर विविध मागण्यांसाठी मंगळवार १२ ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन केले. यशोवर्धन हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

मुख्यकार्यकारी अधिकारी गुलबाराव खरात यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, भिंगारा, चाळीस टापरी, गोमाळ येथील प्रलंबित शैक्षणिक मागण्या पूर्ण करण्यात याव्यात. भिंगारा येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असतांना मात्र शिक्षक संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इयत्ता 9 व 10 साठी तातडीने शिक्षकांची नेमणूक करत असतांना मुलीची संख्या लक्षात घेता एकही महिला शिक्षिका नसल्याने त्यांची शैक्षणिक कुचंबना होत आहे. चाळीस टापरी येथे शाळा व अंगणवाडी बांधकाम करण्यात यावे. गोमाळ येथील सध्या कार्यरत शिक्षक कर्तव्यावर असतांना मद्यपान करत असल्याचे सुध्दा निदर्शनास आले. ही बाब निंदनीय असून संबंधीत शिक्षकास तातडीने बडतर्फ करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.
आदिवासींच्या समस्यावरुन यशोवर्धन सपकाळ आक्रमक
अनेक वेळा तक्रारी, विनंती अर्ज, निवेदन देवूनही आदिवासी बांधवांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे पुत्र यशोवर्धन सपकाळ जिल्हा परिषदेत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आदिवासींच्या समस्यांवर प्रशासन डोळेझाक करत असल्याचे ते म्हणाले. तर गुलाबराव खरात यांनी कॅबिन समोर येवून आदिवासी बांधवांच्या समस्या ऐकूण घेतल्या. दारू पिवून येणार्या शिक्षकाचे निलंबन करण्यात येईल, ज्या गोष्टी तात्कळ मार्गी लावता येतील त्यासंबधीत आदेश देण्यात आले आहे. तसेच २८ ऑगस्टला भिंगारा, चाळीस टापरी, गोमाळ येथील दौरा करणार असल्याचे खरात यांनी सांगितले.