High Court Aurangabad Bench Verdict: बीड जिल्ह्यातील मातोरी येथे दगडफेक ; नऊ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

Chhatrapati Sambhajinagar News

High Court Aurangabad Bench Verdict: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या गावी मातोरी येथे लक्ष्मण हाके समर्थक यांच्या फेरीवर हल्ल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपींपैकी नऊ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे अर्ज केला होता. तो औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी साहेब यांनी मंजूर केला.

High Court Aurangabad Bench Verdict

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या गावी मातोरी येथे लक्ष्मण हाके समर्थक यांच्या फेरीवर हल्ल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपींपैकी नऊ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे अर्ज केला होता. तो औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी साहेब यांनी मंजूर केला.

सरपंच सुखदेव ढाकणे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार,  अशोक श्रीधर जरांगे व इतर २८ जणांसह अज्ञात ५० ते ६०  आरोपींनी मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून गाड्या अडवून जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार, चकलांबा पोलिसांनी  विविध कलमान्वये अशोक जरांगे, संतोष जरांगे, गोविंद जरांगे, अनिल उर्फ महाराज जरांगे, देवीदास जरांगे, अभय जरांगे, संदीप जरांगे, रोहिदास जरांगे व सुदाम जरांगे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  याप्रकरणी बीड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने उपरोक्त नऊ आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. त्यानंतर आरोपींनी अ‍ॅड. प्रकाश गायकवाड व अ‍ॅड. प्रसाद डिकले यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी याचीका दाखल केली होती. त्यावर सुनावणी वेळी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी आरोपींच्या वतीने युक्तिवाद करत दाखल गुन्ह्यात अटकेची आवश्यकता नसल्याचे तसेच दाखल गुन्हा नुकसान भरपाईचा भाग असल्याचा युक्तिवाद  केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »