‘Har Din Jal’ in Buldhana : शहरात वर्षभरापासून शंभर कोटी रुपयांच्या नळ योजनेचे काम सुरु असून, ते आता अंतिम टप्यात आले आहे. शहरवासियांनी लवकरात लवकर नविन नळ जोडणी कनेक्शन करून घ्यावीत, जवळपास 31 मार्च नंतर बुलढाणा शहरात दररोज पाणी पुरवठा होणार असल्याची घोषणा आ. संजय गायकवाड यांनी केली.
बुलढाणा : शहरात वर्षभरापासून शंभर कोटी रुपयांच्या नळ योजनेचे काम सुरु असून, ते आता अंतिम टप्यात आले आहे. शहरवासियांनी लवकरात लवकर नविन नळ जोडणी कनेक्शन करून घ्यावीत, जवळपास 31 मार्च नंतर बुलढाणा शहरात दररोज पाणी पुरवठा होणार असल्याची घोषणा आ. संजय गायकवाड यांनी केली. 28 डिसेंबर रोजी मातोश्री कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नगर परिषदेतर्फे यावर्षी नव्या नळ योजनेचे कामे सुरू करण्यात आली. ही कामे आता अंतिम टप्यात आली असून, 1 जानेवारीपासून शहरातील पाचपैकी चार झोनची चाचणी होणार आहे. यासाठी नागरिकांनी नवी नळ जोडणी तातडीने करणे गरजेचे आहे. जवळपास 31 मार्च नंतर बुलढाणा शहरात दररोज पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. याकरीता खडकपूर्णाचे पाणी महिण्याभरात आपल्या येळगाव धरणात येत आहे. डोंगरखंडाळा येथे नवीन प्रकल्पाची निर्मिती होणार आहे. आहे त्या व्यवस्थेवर नागरिकांना तीन महिण्याच्या आत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. असे आ. गायकवाड यांनी सांगितले.