Gutkha worth in Malkapur: मलकापूरात कारसह साडेसात लाखाचा गुटखा जप्त; एकास अटक, दोघे फरार

Gutkha worth with car in Malkapur
Gutkha worth in Malkapur: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या एकास अटक करीत साडेसात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने  २९ मार्चच्या रात्री उशीरा तहसील चौकात करण्यात आली.
मलकापूर: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या एकास अटक करीत साडेसात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने  २९ मार्चच्या रात्री उशीरा तहसील चौकात करण्यात आली. यावेळी दोघेजण पळून गेले.
मलकापूर शहर पोलिसांनी धरणगाव ते शहरातील तहसील चौका दरम्यान नाकाबंदी तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवित असतांना शहर पोलीस निरिक्षक अनिल गोपाल यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सापळा रचित एमएच- ४३ एएफ-६५६२ हे वाहन पकडले. यावेळी सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल व सुगंधित गुटखा आढळून आला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी चालक शेख यासीन शेख रहमान रा.मोमीनपुरा पारपेठ मलकापूर याला ताब्यात घेतले. तर आरोपी साजिद खान चांद खान (कॅप्टन), इरफान खान रहमान खान उर्फ बाबू खान रा.पारपेठ मलकापूर हे दोघे फरार झाले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशावरून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अनिल गोपाल व डीबी.पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »