जालना : शिक्षकांच्या पगारातून कपात केलेल्या तब्बल 1 कोटी ३४ लाखांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या समन्वयक आणि गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या अपहार प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी दिले आहेत.

परतूर तालुक्यातील 542 शिक्षकांच्या 1 कोटी 34 लाख 45 हजार 438 रुपयांच्या रकमेवर डल्ला मारून ती रक्कम स्वतः च्या खात्यात वळती करीत अपहार केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी आयकाराची रक्कम हडप करणाऱ्या शालार्थ समन्वयकावर आणि या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या दोघांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश सीईओ मिनियार यांनी दिले. शिक्षकांच्या पगारातून कपात केलेली आयकराची रक्कम गटशिक्षणाधिकारी यांच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात वर्ग करणारा शालार्थ समन्वयक सहशिक्षक चंद्रकांत पौळ आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे या दोघांवर आता पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिरी कैलास दातखीळ यांना देण्यात आले आहे.