वडोद बाजार : फुलंब्री तालुक्यातील दुधड येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पन सोहळा रविवार, 28 डिसेंबर रोजी पार पडला. आमदार निधीतून करण्यात येत असलेल्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

दुधड येथे झालेल्या या कार्यक्रमात लहुकी नदीवर संरक्षक भिंत व घाटाचे बांधकाम, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम, आर.आर.आबा स्मार्ट ग्राम बक्षीस रक्कमेतून गट नं. १६८ येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, गट नं.१६८ मध्ये भूमिगत गटार (ड्रेनेज) लाईन बांधकाम, तलाठी भवन इमारत बांधकाम, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे, तांडा वस्ती सुधार योजना स्ट्रीट लाईट बसविणे, ग्रामनिधीतून नव्या पुलावर सेप्टिक टँक बांधकाम करणे, चर्चसाठी संरक्षक भिंत बांधकाम करणे, व्यायामशाळा साहित्याचे लोकार्पण आदींचा यामध्ये समावेश आहे. याप्रसंगी दामूअण्णा नवपुते, सजन मते, भाऊराव मुळे, आप्पासाहेब शेळके, अशोक पवार, त्रिंबक सुलाने, सरपंच गंगासागरबाई चौधरी, उपसरपंच बाळासाहेब बोरुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.