फ्लोरिडा : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर २६ जून रोजी दुपारी ४ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. पूर्वी त्यांचा आगमन वेळ ४:३० वाजता होता. म्हणजेच हे अंतराळवीर वेळेच्या ३० मिनिटे आधी अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. शुभांशु शुक्ला ‘आयएसएस’ वर जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. त्याआधी, मिशन क्रूने अंतराळयानातून लाईव्ह संभाषण केले. यामध्ये शुभांशूने म्हटले, अंतराळातून नमस्कार! माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत येथे येऊन मी खूप उत्साहित आहे.

शुभांशू शुक्ला म्हणाले, जेव्हा आम्हाला व्हॅक्यूममध्ये सोडण्यात आले, तेव्हा मला फारसे बरे वाटत नव्हते. मी खूप झोपलो. मी इथे लहान मुलासारखा शिकत आहे. अंतराळात कसे चालायचे आणि कसे खायचे. अॅक्सियम मिशन ४ अंतर्गत, सर्व अंतराळवीर २५ जून रोजी दुपारी १२ वाजता आयएसएसकडे रवाना झाले. तांत्रिक बिघाड आणि हवामानाच्या समस्यांमुळे हे मिशन ६ वेळा पुढे ढकलण्यात आले.
४१ वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर अवकाशात
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. ४१ वर्षांपूर्वी, राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.
ड्रॅगन ग्रेसचे ‘आयएसएस’ वर स्वागत
‘आयएसएस’ वरील मोहीम 73 चे सदस्य नासाचे अॅस्ट्रोनॉट्स निकोल एयर्स, अॅनी मॅकलेन, आणि जॉनी किम, जाक्साचे ताकुया ओनिशी, तसेच रशियन कॉस्मोनॉट्स किरील पेस्कोव, सर्जी रायझिकोव आणि अलेक्सी जुब्रिट्स्की यांनी एएक्स-4 च्या क्रूचे स्वागत केले. डॉकिंगनंतर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन स्वागत सोहळा आणि सुरक्षाविषयक माहिती सत्र घेतले.