Chhatrapati Sambhajinagar: मानलेल्या भावाचा मित्रांच्या मदतीने महिलेवर सामूहिक अत्याचार

The Badlapur incident

Chhatrapati Sambhajinagar: शहरात हृदयाचे ठोके चुकविणारी घटना घडली असून, एका महिलेवर मानलेल्या भावानेच त्याच्या मित्राच्या साथीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील एका आरोपीस अटक करण्यात यश जरी आले असले तरी अद्याप दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Abuse of young woman
Abuse of young woman

छत्रपती संभाजीनगर : पर्यटन राजधानी असलेले छत्रपती संभाजीनगरही आता गुन्हेगारीचे ‘कॅपीटल’ म्हणून उदयास येत आहे. शहरात हृदयाचे ठोके चुकविणारी घटना घडली असून, एका महिलेवर मानलेल्या भावानेच त्याच्या मित्राच्या साथीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील एका आरोपीस अटक करण्यात यश जरी आले असले तरी अद्याप दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शहरा लगत असलेल्या एका परिसरातील रहिवाशी असलेली ३८ वर्षीय महिलेने तिचा मानलेला भावास याला फोन केला. माझी कोर्ट केस सुरू असून, मी आर्थिक अडचणीत आहे. मला दोन हजार रुपये उसने हवे आहेत, अशी मागणी तिने त्याला केली. त्यानेही दोन हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. तिला सावंगी बायपास रोडवर बोलवून घेतले. सावंगी बायपास रोडवर दोघांची भेट झाली. थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर त्याने तिला माझ्यासोबत चल, असे म्हणून दुचाकीवर बसविले. दुचाकी थेट केंब्रिज चौकाकडे घेऊन गेला. तोपर्यंत रात्रीची आठ वाजले होते. तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर दोन अनोळखी व्यक्ती आले आणि पुढील कृत्य करण्यास सुरुवाती केली.

मंगळसूत्र आणि मोबाइलही हिसकावला

त्या तीन नराधमांनी त्या पीडितेवर लैंगिक अत्याचार तर केलाच सोबतच पीडितेच्या अंगावरील २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दहा हजार रुपयांचा मोबाइल लुटून नेला. त्या नराधमांच्या तावडीत सुटून महिलेने कसेबसे घर गाठले. घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्या दोघांनी अखेर सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून शनिवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली.

एक आरोपी अटकेत…

दरम्यान एम. सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम पठारे पातारे यांनी सांगितले की, हे प्रकरण संवेदशील असल्याने अजून तपास सुरू आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. त्या दोघांनाही लवकरच अटक करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »