dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

फिरोजपूर–नांदेड ट्रेनवरून संताप; वाशिम–हिंगोली डावलले

वाशिम : नाताळ व वर्षाअखेरीच्या गर्दीच्या काळात फिरोजपूर ते नांदेड विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला असली, तरी या गाडीला अकोला–पूर्णा मार्गावरील वाशिम, हिंगोली आणि वसमतसारख्या महत्त्वाच्या जिल्हा व तालुका स्थानकांवर थांबा देण्यात न आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे हजारो रेल्वे प्रवासी तसेच शीख भाविक अडचणीत सापडले असून, थांबा न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, २४ ते ३० डिसेंबरदरम्यान विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०४६४३ आणि ०४६४४ फिरोजपूर कॅन्टोन्मेंट–नांदेड दरम्यान धावणार आहे. ही गाडी २४ व २८ डिसेंबर रोजी फिरोजपूरहून सुटेल, तर २६ व ३० डिसेंबर रोजी नांदेडहून फिरोजपूरकडे धावेल. सदर विशेष गाडी भटिंडा, जाखल, जिंद, रोहतक, शकूरबस्ती, दिल्ली सफदरजंग, मथुरा, भरतपूर, सवाई माधोपूर, सोगारिया, गुना, भोपाळ, भुसावळ कॉर्ड लाईन, अकोला आणि पूर्णा मार्गे धावणार आहे. मात्र, अकोला–पूर्णा या मार्गावरील वाशिम, हिंगोली आणि वसमत या मोठ्या स्थानकांना थांबा देण्यात न आल्याने प्रवाशांमध्ये असंतोष आहे. विशेषतः शीख भाविकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या गाडीचा लाभ या भागातील प्रवाशांना मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा विकास समितीच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात फिरोजपूर–नांदेड विशेष गाडीला हिंगोली, वाशिम आणि वसमत स्थानकांवर थांबे देण्याची ठाम मागणी करण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर माजी झेडआरयूसीसी सदस्य राकेश भट्ट, वाशिमचे महेंद्रसिंग गुलाटी, वसमतचे दीपक कुलचे, नवीन चोकडा, सय्यद रियाज अली, शोएब वसेसा, बाबा घुगे, गोविंद प्रजापती आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top