छत्रपती संभाजीनगर : मोबाइल व पैसे घेतल्याच्या संशयातून मित्रांनीच एका मित्राला डोंगरावर नेत गळा चिरून हत्या केली. त्याआधी त्यांनी त्याच्या पायाला सिगारेटचे चटके दिले, डोळ्यांना पट्टी बांधून मारहाण केली. हा प्रकार मंगळवार, ६ जानेवारी रोजी जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरात घडला.

छत्रपती संभाजीनगर : मोबाइल व पैसे घेतल्याच्या संशयातून मित्रांनीच एका मित्राला डोंगरावर नेत गळा चिरून हत्या केली. त्याआधी त्यांनी त्याच्या पायाला सिगारेटचे चटके दिले, डोळ्यांना पट्टी बांधून मारहाण केली. हा प्रकार मंगळवार, ६ जानेवारी रोजी जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरात घडला. प्रकरणी सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली ऊर्फ मोठा सिराज यास अटक केली, तर छावणी ठाण्यात त्याच्यासह छोटा सिराज, जब्बार, कबीर व अन्य एक अशा एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला.
शकील आरेफ शेख (३०, रा. फुलेनगर) असे मृताचे नाव आहे. मृताचा भाऊ सलमान आरेफ शेख याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आरोपी सिराजने शकील धमकी दिली होती.
