Kapil Patil in Congress : समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील काँग्रेसमध्ये

Kapil Patil in Congress

Kapil Patil in Congress : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Kapil Patil in Congress

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते. कपिल पाटील यांच्यासोबत अतुल देशमुख आणि वनिता तिरपुडे यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता कपिल पाटील यांना गोरेगाव विधानसभा मिळण्याची शक्यता आहे.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जनता दलाला रामराम केल्यानंतर आणि समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली होती. मात्र, आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीमध्ये गोरेगाव किंवा वर्सोवा ही जागा काँग्रेसला सुटणार आहे. त्या जागेवर कपिल पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

आम्ही बिनशर्त काँग्रेसमध्ये प्रवेश केला : कपिल पाटील

आज आम्ही काँग्रेस पक्षात समाजवादी गणराज्य पक्ष विलीन केला असल्याचे कपिल पाटील म्हणाले. आज खर्गेंच्या निवासस्थानी माझ्या गळ्यात शाल घातली आहे. फॅसिझम विरुद्ध लढायचे आहे. फॅसिझम विरोधात राहुल गांधी लढत आहेत. आम्ही बिनशर्त काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फॅसिझम विरोधात लढायचं हीच अट आहे. देशात संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधींनी प्रदीर्घ लढा दिला असल्याचे कपिल पाटील म्हणाले.

शिक्षक भारती कपिल पाटील यांच्यासोबत

बुलढाणा : शिक्षक भारती आमदार कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करून अनेक शिक्षकांना न्याय दिला आहे. शिक्षक भारतीचे जाळे त्यांनी राज्यभर पसरवले आहे. मराठवाड्यासह विदर्भातही शिक्षक भारतीचे मोठे नाव आहे. शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून कपिल पाटील यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे मोठे काम केले असून बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक भारती कपिल पाटील यांच्यासोबत असल्याचे मत शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य अशोक खोरखेडे यांनी दैनिक महाभूमिशी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »