Fire in Chhatrapati Sambhajinagar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 18 एप्रिल रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास विद्यापीठ परिसरात अचानक मोठी आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 18 एप्रिल रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास विद्यापीठ परिसरात अचानक मोठी आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमन दलाच्या पथकाने सुमारे अर्ध्या तासानंतर ही आग आटोक्यात आणली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात कुलगुरूंच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या यूजीसी मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या गेस्ट हाऊस परिसरात रात्री ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे या गेस्ट हाऊस शेजारीच असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि ते भीतीपोटी मैदानात आले. त्यांनीच सुरूवातीला ही आग विझवण्याचा प्रयत्न केला.
पाहता पाहता आगीने विक्राळ रुप धारण केले आणि आगीचे मोठेच्या मोठे लोळ उठू लागले. या आगीची माहिती मिळताच महानगर पालिकेचे अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन पथकाने रात्री १२.२५ वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आणली. आगीमुळे विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.