नगर पालिकेच्या रेकॉर्ड रुमला आग;दस्तऐवज जळून खाक

डोणगाव : मेहकर नगरपालिकेच्या इमारतीतील रेकॉर्ड रूमला अचानक आग लागली. या आगीमध्ये रेकार्ड रूममधील  मे 2025 पर्यंतचे महत्वाचे दस्तएैवज जळून खाक झाले. ही घटना शनिवार 3 मे रोजी पहाटे सकाळी सव्वा पाच वाजता घडली. शॉर्ट सर्किटमुळे सदर आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मेहकर नगर परिषदेचे अग्निशमन वाहन दुरुस्तीसाठी सोलापूर येथे गेलेले असल्याने लोणार येथून अग्निशमन विभागाचे वाहन बोलावून ही आग विझविण्यात आली. 

डोणगाव : मेहकर नगरपालिकेच्या इमारतीतील रेकॉर्ड रूमला अचानक आग लागली. या आगीमध्ये रेकार्ड रूममधील  मे 2025 पर्यंतचे महत्वाचे दस्तएैवज जळून खाक झाले. ही घटना शनिवार 3 मे रोजी पहाटे सकाळी सव्वा पाच वाजता घडली. शॉर्ट सर्किटमुळे सदर आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मेहकर नगर परिषदेचे अग्निशमन वाहन दुरुस्तीसाठी सोलापूर येथे गेलेले असल्याने लोणार येथून अग्निशमन विभागाचे वाहन बोलावून ही आग विझविण्यात आली. 

नगरपालिकेच्या सुसज्ज इमारतीत रेकॉर्ड जतन करून ठेवण्यासाठी असलेल्या रेकॉर्ड रूममधून सकाळी मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे

नगर पालिकेचा सुरक्षा रक्षक रमेश अवसरमोल यांना प्रथम दिसून आले. मात्र त्यांच्याजवळ मोबाईल नसल्याने त्याने महावितरणच्या कार्यालयात रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या रखवालदाराला झोपेतून उठवून त्याच्या मोबाईलवरून कॉल करून नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आगीबद्दल माहिती दिली.  त्यानंतर पालिकेचे ५० हून अधिक कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी आले. रेकॉर्ड रूमला लागलेली आग दरवाजे, खिडक्या बंद असल्याने कमी प्रमाणात होती मात्र  रेकॉर्ड रूमचा दरवाजा उघडताच ऑक्सीजन मिळाल्याने आगीने भडका घेतला. मागील दीड वर्षापासून नगर पालिका इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे इमारतीतील सीसी कॅमेरे बंद ठेवण्यात आले आहेत. इमारतीच्या नुतनीकरण कामादरम्यान काही ठिकाणचे वायरिंग काढण्यात आले आहे. तर काही ठिकाणी वायर मोकळे आहेत कदाचित शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

शासकीय कार्यालयातील दुसरी आग

2022 च्या मार्च एंडला म्हणजे 31 मार्च 2022 रोजी मेहकर नगर पालिकेच्या शेजारीच असलेल्या तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाला अशीच आग लागली होती. त्या आगीमध्ये  उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयाचे व निवडणूक विभागाचे कागदपत्रे जळून खाक झाली होती. त्यामुळे शासकीय कार्यालयातील आगीची ही दुसरी घटना आहे. 

फायर सेप्टी तपासणाऱ्या न.प.लाच फायर सेप्टी नाही

     शहरातील फायर सेफ्टी साठीचे सर्व कामे त्यांची पाहनी फायर ऑडिट केल्या नंतर नॅशनल बिल्डिंग कोडच्या मानकानुसार इमारतीमधील फायर सेफ्टी आहे का? याची पाहणी करून त्याला ‘नाहरकत’ देण्याचे काम नगर पालिका करते.त्यासाठी प्रत्येक नगर पालिकेमध्ये अग्नीशमन विभाग असतो. त्याला एक प्रमुख असतो. तो प्रमुख सध्या मेहकर न.प.ला नाही. न.प.इमारतीचे नूतनीकरण सुरु असून त्याचे बजेट 5 कोटी आहे मात्र त्यात फायर सेफ्टी सिस्टम नाही यावर बांधकाम अभियंता अजय मापारी यांना विचारले असता त्यांनी नूतनीकरण सुरु आहे त्यात फायर सेफ्टी सिस्टमचे बजेट नाही मात्र अगीच्या घटनेला पाहता फायर सेफ्टी सिस्टम बसवल्या जाणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »