खामगाव – तालुक्यातील आकोली ते अटाळी रोड वरील गटुच्या कंपनीला आग लागल्याची घटना आज २४ मार्च रोजी रात्री ७ वाजेदरम्यान उघडकीस आली.

खामगाव – तालुक्यातील आकोली ते अटाळी रोड वरील गटुच्या कंपनीला आग लागल्याची घटना आज २४ मार्च रोजी रात्री ७ वाजेदरम्यान उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, खामगाव तालुक्यातील आकोली ते अटाळी रोड वरील गट्टू ची कंपनी असून त्या कंपनीला भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आग विजण्याचे प्रयत्न सुरू केले. खामगाव नगरपरिषद अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सदर आग ही कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. या आगीमुळे गट्टूच्या कंपनीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशी माहिती मिळाली.