Fire breaks out at a textile shop in Chhatrapati Sambhajeenagar : छत्रपती संभाजीनगमध्ये कापड दुकानाला भीषण आग

आगीत जळालेले कापड दुकान

Fire breaks out at a textile shop in Chhatrapati Sambhajeenagar : शहरातील छावणी परिसारत पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका कापडाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुकानाला लागलेल्या आगीत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.

आगीत जळालेले कापड दुकान
आगीत जळालेले कापड दुकान

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसारत पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका कापडाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुकानाला लागलेल्या आगीत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
छावणी या ठिकाणी आग लागली. या घटनेत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आग लागलेल्या इमारतीत एकूण १६ जण राहात होते. पहिल्या मजल्यावर सात, दुसऱ्या मजल्यावर सात आणि तिसऱ्या मजल्यावर दोन जण राहात होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.

एकाच कुटुंबातील सात जणांचा आगीत (Fire breaks out) होरपळून मृत्यू

कापड दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पुरूष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.

 

आगीत (Fire breaks out) मृत्यू झालेल्यांची नावे

आसिम वसीम शेख, (वय3 वर्ष)

परी वसीम शेख  (वय 2 वर्ष)

वसीम शेख (वय 30 वर्ष)

तन्वीर वसीम (वय 23 वर्ष)

हमीदा बेगम ( वय 50 वर्ष)

शेख सोहेल (वय 35 वर्ष)

रेश्मा शेख  (वय 22 वर्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »