dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सिंदखेड येथे कौटुंबिक वादातून  वडीलांची हत्या; आराेपी मुलाला अटक 

धामणगाव बढे : कौटुंबिक वादातून मुलाने स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने वार करून खून केला.  ही  धक्कादायक घटना १७ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. या प्रकरणी २१ एप्रिल रोजी मध्यरात्री धामणगाव बढे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

  यश नंदकिशोर  बावणे   असे खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचे त्याच्या वडिलांसोबत घरगुती कारणांवरून नेहमी वाद होत असे.  याच रागातून १७ एप्रिलच्या रात्री त्याने वडिलांच्या डोक्यात आणि छातीवर फावड्याच्या दांड्याने मारहाण केली, यामध्ये नंदकिशोर यांचा मृत्यू झाला. १४ एप्रिल रोजी घडलेल्या कुटुंबात झालेल्या वादातून हा वाद झाला हाेता. कुटुंबात होणाऱ्या नेहमी वादामुळे   नंदकिशोर यांची पत्नी कविता बावणे यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना बुलढाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच ही हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी मृतकाचे भाऊ  विद्यानंद कौतिक बावणे यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे भैय्या उर्फ यश नंदकिशोर बावणे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top