Accident at Maththanda turn on Jalna – Vadigodri route: जालना – वडीगोद्री मार्गावरील मठतांडा या गावाजवळ असणाऱ्या वळण रस्त्यावर बस आणि संत्रा घेऊन जाणाऱ्या आयशरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच २१ जखमी आहेत.
रामदास पटेकर/अंबड : जालना – वडीगोद्री मार्गावरील मठतांडा या गावाजवळ असणाऱ्या वळण रस्त्यावर बस आणि संत्रा घेऊन जाणाऱ्या आयशरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच २१ जखमी आहेत. ही घटना शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी ८.२५ वाजेच्या दरम्यान घडली असल्याची माहिती बस चालक गोरक्षणाथ खेत्रे वय ३७ वर्ष यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार विजय चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, वाहतूक शाखेचे बी.एन. रयतुवार यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची चौकशी केली. घटनास्थळी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्यासह पथक घटनास्थळी मदतीला धावले.
गेवराई आगाराची गेवराईहून जालन्याकडे जाणारी बस क्र.एम एच २० बी एल ३५७३ आणि जालना येथून भरधाव वेगाने संत्रा घेऊन जाणारा आयशर टेम्पो क्र.एम एच ०१सी आर ८०९९ चा मठ तांडाजवळ अंतुल राठोड यांच्या गट नंबर १० या शेत जमिनीजवळ भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच मठतांडा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. जोराचा अपघात असल्याने बसचे आसन देखील जाग्यावरून उखडून पडले आहेत. जखमींना प्रथम अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथुन गंभीर जखमींना जालना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मी माझ्या गाडीला वाचविण्याचा माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला. मात्र समोरून येणाऱ्या भरधाव वेगाच्या आयशरने कसलाही वेग कमी केला नाही. तो रॉंग साईडने वाहन चालवून माझ्या अंगावर आला. मात्र समोर एका बाजूने कठडे व दुसऱ्या बाजूने खड्डे होते. समोरून येणाऱ्या आयशर चालकाने गती कमी करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. मी माझ्या साईडने चाललो होतो. मी 60 किमी वेगाने होतो माझ्या गाडीचा वेग पूर्ण कमी नाही असतांनाही तो येऊन धडकल्याने अपघात झाला.
– गोरक्षणाथ लक्ष्मण खेत्रे
मृतकांची नावे
वाहक बंडू तुळशीराम बारगजे वय ५३ वर्ष रा.वडगाव डोक ता.गेवराई ,पंचफूला भगवान सोळुंके वय ६५ वर्ष रा. सुर्डी (बू) ता.गेवराई,सतीश देविदास नाईक वय २९ वर्ष (आयशर चालक क्लीनर) रा.मुरादेवी, शेख जब्बार वय ५२(आयशरचालक) रा.मुरादेवी,राहिबाई रंगनाथ कळसाईत वय ६५ वर्ष रा.मेहकर व एका महिलेची ओळख पटली नाही.
हे आहेत जखमी
१) कार्तिक सतीष कुऱ्हाडे (वय ३ वर्षे)
२) कलाबाई चिमाजी कुऱ्हाडे (७० वर्षे) दोन्ही रा.सुखापुरी
३) युसेरा सोहेल बागवान (४ वर्षे)
४) आफीफा मोसीन बागवान( १३ वर्षे)
५) आरसीया मोबीन बागवान ( ४५ वर्षे) रा. सेलु
६) सिध्देश्वर गणेश क्षीरसागर (वय १२ )
७) गणेश कचरु क्षीरसागर (वय ३६ ) रा.ब्रम्हनाथ येळबं ता शिरूर जि बीड
८) गोरक्षनाथ लक्ष्मण खेत्रे (बस चालक) वय ३७ वर्ष रा वाहेगाव ता गेवराई
९) भारत बन्सी हिदुडे (वय ५५) रा मारकर वाडी ता.शिरुर
१०) प्रभाकर भाऊराव गाडेकर (वय ५५) रा रेवकी देवकी ता.गेवराई
११) बापुराव राधाकिसन निकम (वय ५३) रा साडेगाव ता अंबड
१२) शिफा मोसीन बागवान (वय १० वर्षे)रा शहागड
१३) कमल प्रभाकर गाडेकर (वय ५०) रा.रेवकी देवकी ता गेवराई
१४) विजयकुमार रमेश रावल (वय २० वर्षे) उत्तराखंड
१५) कमल रमेश रावल (४० वर्षे) रा उत्तराखंड
१६) भारत गणेश क्षीरसागर वय (३६)
१७ ) ओमकार मनोज गुंगासे (१७) रा.साष्टपिंपळगाव
१८) अंजली अनिल गुंगासे (वय १५) रा साष्टपिंपळगाव
१९) प्रभाकर भाऊराव गाडेकर वय ४५
२०) प्रविण अनिल सुराशे (वय २२) रा अंतरवाली सराटी
२१) आफसाना सोहेल शेख (वय ३ वर्षे)
२२) सायली गजानन सपकाळ (१९ वर्षे) रा.महाकाळा