बुलढाणा : शेती हा व्यवसाय पूर्णता: निसर्गाच्या भरोशावर विसंबून आहे. वेळी-अवेळी बरसणाऱ्या पावसामुळे कोणते पीक घ्यावे, कोणते घ्येवू नये, या विंवचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून फळभाजीपाला किंवा दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास शेती व्यवसायात देखील उच्च भरारी.. घेता येते. विदर्भ आणि मराठवाड्याच्या सिमेवरील जनूना येथील शेतकरी दिलीप किसन राजपूत यांनी शेतात पेरू, काकडी लागवडीच्या माध्यमातून तसेच दुग्ध व्यवसायाची जोड देवून उत्पन्न कसे वाढविता येते याचा आदर्श निर्माण केला आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या जनूना गुम्मी येथील शेतकरी दिलीप किसन राजपूत यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून आपल्याकडील 12 एकर जमिनीवर पारंपरिक सोयाबीन, मका लागवडीसोबतच अर्धा एकरावर शेडनेट ची उभारणी केली. या शेडनेट मध्ये बेडवर मल्चिंग करुन काकडीची लागवड केली. त्यासाठी ठिंबक सिंचनाद्वारे पाण्याची सुविधा व जैविक खत, औषधांचा जमिनीद्वारे डोस देवून काकडी पिकांच्या लागवडीतून वर्षात तीनदा उत्पादन घेत दुप्पट नफा प्राप्त केला. तर पेरू लागवडीतून देखील चांगले उत्पादन घेतले. शेतकरी राजपूत काकडी, पेरू शेती करण्यावर थांबले, नाहीतर त्यांनी शेतीला दुग्धव्यवसाची जोड देण्यासाठी 24 संकरित गाईचा सांभाळ केला. त्यामाध्यमातून दररोज सकाळी आणि संध्याकाळ मिळून 200 लिटर दूध 34 रुपये लिटर प्रमाणे विक्री करुन राजपूत यांनी उत्पन्नाचे आणखी एक द्वार उघडले.
अशी केली सिंचनाची व्यवस्था
12 एकर क्षेत्रात पिकांना सिंचन करण्यासाठी शेतकरी राजपूत यांनी विहीर, शेततळे व गावालगत असलेल्या जनूना तलावावर पंप बसवून पिकांना सिंचन करण्याची व्यवस्था केली आहे.
अशी वाढविली जमिनीची सुपीकता
दरवर्षी एक एकर जमिनीत ताग लागवड करतात. तीन महिन्याचे असलेले हे पीक नंतर नांगटी करुन जमिनीत गाडतात. त्याचे कुजून खत बनते आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. असे ते सांगतात.
या उत्पादना मागे सातत्य पूर्ण परिश्रम आहेत. अनेकदा विविध अडचणींना समोरे जावे लागले. परंतु शेतीत नवीन काहीतरी करण्याचे बाळगलेले स्वप्न आज पूर्ण झाल्याने मनाला समाधान वाटते. इतर शेतकऱ्यांनी देखील शेतीला जोड व्यवसायाची जोड दिल्यास निश्चितीच.. उत्पादन वाढण्यास मदतच मिळेल.
– दिलीप किसन राजपूत, प्रगतीशील शेतकरी, जनूना गुम्मी