जालना : सासू-सुनेचे शेत जमिनीवरून वाद सूरू असताना जालना जिल्हा रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक झाली. यात सहा जण जखमी झाले. ही घटना गुरूवार, 10 एप्रिल रोजी दुपारी घडली.

जालना : सासू-सुनेचे शेत जमिनीवरून वाद सूरू असताना जालना जिल्हा रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक झाली. यात सहा जण जखमी झाले. ही घटना गुरूवार, 10 एप्रिल रोजी दुपारी घडली.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जालना तालुक्यातील माळेगाव शेंद्रा येथील रहिवासी राधाबाई दिंडे आणि शारदा दिंडे या दोघी सासूसुना असून त्यांच्यात शेत जमिनीवरून वाद सूरू आहे. बुधवारी त्यांच्यात मारहाण झाली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या शारदा दिंडे यांच्या पतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन्हीही गटातील लोक गुरूवारी जिल्हा रूग्णालयात आले होते. त्यांच्यात पुन्हा वादावादी सूरू झाली आणि या वादातून दगडफेक झाली. यात 6 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे एका गटाने पळ काढला. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिली. सध्या जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.