Embezzled lakhs in Ujjivan Small Finance Bank:महिला कर्मचाऱ्यांनीच केला उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेत लाखोंचा अपहार

embezzled lakhs in Ujjivan Small Finance Bank

Embezzled lakhs in Ujjivan Small Finance Bank: शहरातील एका फायनान्स बॅंकेतील महिला कर्मचाऱ्यांनी बॅंकेत लाखो रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी जवाहर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

embezzled lakhs in Ujjivan Small Finance Bank
embezzled lakhs in Ujjivan Small Finance Bank

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका फायनान्स बॅंकेतील महिला कर्मचाऱ्यांनी बॅंकेत लाखो रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी जवाहर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवाहर नगर पोलीस स्टेशनमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेचे विजिलन्स मॅनेजर राजेश प्रकाश जाधव यांनी तक्रार दाखल केली की, आरोपी सीआरओ स्वप्नरेखा भानुदास चौधरी, सुरेखा ढोरे, कविता राठोड आणि पुष्पा साळवे या चार महिला कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंत उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंक ( शाखा क्रमांक 4454) मध्ये विश्वासघात करुन बँकेची 34 लाख 60 हजार 344 रुपयांची आर्थिक फसवणूक करुन अपहार केला. अशी तक्रारीवरुन जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 406, 420 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »