Earthquake in Nanded, Hingoli : नांदेडमध्ये मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ३.८ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
नांदेड : नांदेडमध्ये मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ३.८ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने एक्सवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, ‘नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली ५ किलोमीटर नोंदवण्यात आली. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.’
EQ of M: 3.8, On: 22/10/2024 06:52:40 IST, Lat: 19.38 N, Long: 77.46 E, Depth: 5 Km, Location: Nanded, Maharashtra.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/HxYmNEiZfs— National Center for Seismology (@NCS_Earthquake) October 22, 2024
महिनाभरापूर्वी अकोला, अमरावती जिल्ह्यांत भूकंप
यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी अमरावती जिल्ह्यात गेल्या महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजनगाव सुर्जी तसेच मेळघाटातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अचलपूरपासून ४०० मीटर दूर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.