dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Buldhana Vidhan Sabha Election: आमदारकीची घाई ; पहिल्याच दिवशी शंभराहून अधिक इच्छुकांनी उचलले अर्ज

Buldhana Vidhan Sabha Election:   विधानसभा निवडणुकीला २२ ऑक्टोबर पासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. २२ ऑक्टोबरपासून नामनिर्देशपत्र दाखल करण्यात येत असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात शंभराहून अधिक इच्छुकांनी अर्ज उचलले आहे.

Buldhana Vidhan Sabha Election

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीला २२ ऑक्टोबर पासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. २२ ऑक्टोबरपासून नामनिर्देशपत्र दाखल करण्यात येत असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात शंभराहून अधिक इच्छुकांनी अर्ज उचलले आहे. सात मतदारसंघात एकूण 105 व्यक्तींनी 188 नामनिर्देशन अर्जाचे उचल केली. मलकापूर विधानसभा मतदारसंघात 18 व्यक्तीनी 41 अर्ज, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 13 व्यक्तीनी 22 अर्ज, 24-चिखली विधानसभा मतदारसंघात 26 व्यक्तीनी 46 अर्ज, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 19 व्यक्तीनी 36 अर्ज, खामगांव विधानसभा मतदारसंघात 14 व्यक्तीनी 22 अर्ज व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 15 व्यक्तीनी 21 अर्ज असे एकूण 105 व्यक्तींनी 188 अर्ज उचल केले आहे.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी 29 आक्टोंबर ही नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. बुधवार, 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार, 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार , 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

मेहकरमध्ये एकाही र्जाची उचल नाही

जिल्ह्यातील सहा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देश अर्जाची उचल केली आहे. मात्र, मेहकर मतदार संघातून पहिल्याच दिवशी एकही अर्ज घेण्यात आला नसल्याची माहिती आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top