डोणगाव : मुलींचा घटता जन्मदर पाहता, शासनाने गर्भलिंग निदान व गर्भपात संदर्भातील कायदे कडक केले आहेत. जन्म घेण्यापूर्वीच निर्दयीपणे कळ्यांना खुडणाऱ्या डॉक्टरांविरूध्द कारवाईसाठी स्वतंत्र पीसीएनडीटी विभागाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही पैशाच्या लालसेपायी वैद्यकीय क्षेत्रातील काही कुप्रवृत्ती या गोरखधंद्यात गुंतले असल्याचे दिसून येते.

डोणगाव : मुलींचा घटता जन्मदर पाहता, शासनाने गर्भलिंग निदान व गर्भपात संदर्भातील कायदे कडक केले आहेत. जन्म घेण्यापूर्वीच निर्दयीपणे कळ्यांना खुडणाऱ्या डॉक्टरांविरूध्द कारवाईसाठी स्वतंत्र पीसीएनडीटी विभागाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही पैशाच्या लालसेपायी वैद्यकीय क्षेत्रातील काही कुप्रवृत्ती या गोरखधंद्यात गुंतले असल्याचे दिसून येते. या श्रृंखलेत काही डॉक्टरांची मध्यस्थी करणारा हिंगोली येथील एकजण 17 एप्रिल रोजी पीसीपीएनडीटी विभागाच्या जाळ्यात अडकला असून, त्याच्याविरूध्द विविध कलमान्वये डोणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेलगाव देशमुख परिसरात 17 एप्रिलच्या रात्री 8 वाजता दरम्यान एक स्विफ्ट डिझायर क्रमांक एमएच 49 ए.एस. 6966 हे पकडण्यात आले. या वाहनात गर्भपातासाठी वापरले जाणारे साहित्य, एक गरोदर महिला, वाहनचालकासोबत एक महिला मिळून आल्या. वाहनाची पीसीपीएनडीटी विभागाने चौकशी केली असता गजानन विठ्ठल वैद्य रा. माझोड ता. सेनगाव जिल्हा हिंगोली वय 38 याने गर्भ निदान करून गर्भपात करून देण्यासाठी एका महिलेकडून पैसे घेऊन गर्भ निदानाअंती मुलगी निघाल्यास गर्भपात करून देण्यासाठी 28 हजार रुपये घेऊन डॉक्टर आल्यावर गर्भलिंग निदान होईल, असे सांगून महिलेला वाशीम जिल्हातील किकसा फाटा येथून स्विफ्ट गाडीत बसवले. तो डोणगावकडे निघाला असता त्याला त्याच्या मागावर कोणीतरी असल्याची माहिती मोबाईलवरून मिळाली. त्यामुळे त्याने आपले वाहन डोणगावकडे न आणता शेलगाव देशमुखकडे वळविले. दरम्यान त्याच्या मागावर असलेल्या पीसीएनडीटी विभागाच्या पथकाने त्याचे वाहन शेलगाव देशमुख जवळ अडवले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात सेफ्टी ग्लोज 4 नग, ब्लड कलेक्शन बॉटल 5 नग, डिसपोजल सिरींज, नगदी 200 च्या 45 नोटा, 500 च्या 38 नोटा असे 28 हजार रुपये जे पीसीपीएनडीटी विभागाने डमी महिलेकडे दिले होते. ते हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी मेहकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम 319,318(1),भारतीय न्याय संहिता कलम 33,33(अ ) वैद्यकीय व्यवसाय 1961 नुसार दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष नारायण माळोदे, ॲड. वंदना तायडे, ज्ञानेश्वर मुळे व पंच गजानन शेवाळे यांचा पथकात समावेश होता. अधिक तपास अशोक गाढवे करीत आहेत.
घाटबोरी येथील एका डॉक्टरचा समावेश
मेहकर तालुक्यातील काही डॉक्टर या प्रकरणात सामील असून ते गर्भ निदानसाठी महिलांना पाठवतात त्यांना संबंधित ठिकाणी बोलावून गर्भवती महिलेला एकटीच गाडीत बसवून घेतले जाते. त्यानंतर मागून एक व्हॅन येते ज्यात त्या महिलेला चालू गाडीत किंवा नियोजित ठिकाणी नेऊन गर्भ निदान केले जाते. गर्भात मुलगी असेलतर गर्भपातसाठी विशेष ठिकाण निवडूण तेथे गर्भपात केला जातो. या प्रकरणात मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील डॉक्टर असून त्याला आरोपीने कॉल केल्याची माहिती मिळाली.
आरोपीला कोणी केला कॉल
या प्रकरणातील आरोपीला तुझ्या मागावर कोणीतरी असून तुझा पिच्छा करीत आहे अशी माहिती फोन कॉलवरून देणारा तो कोण? कुकसा फाटा येथे स्विफ्ट गाडीच्या मागे दोन गाड्या होत्या मात्र त्यांना जसे लक्षात आले की पीसीपीएनडीटी विभागाची यावर नजर आहे तेव्हा ते पळून गेले. या प्रकरणी गर्भ निदान करून देणारा तो कोण तसेच गर्भ निदान नंतर गर्भपात करून देणारे कोण? याचा शोध लागू शकतो