मेहकर :- शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिऱ्यांनी एका वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली आहे.विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यालगतच्या 6 जिल्ह्यातून डॉ टाले यांना तडीपार करण्यात आले आहे.

मेहकर :- शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिऱ्यांनी एका वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली आहे.विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यालगतच्या 6 जिल्ह्यातून डॉ टाले यांना तडीपार करण्यात आले आहे.रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात गेल्या तेरा वर्षापासून डॉ. ज्ञानेश्वर टाले शेतकरी चळवळीत काम करीत आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. राजकीय आकसापोटी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करीत असून, झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचा रॊष कार्यकर्ते व शेतकरी व्यक्त करीत आहेत.यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
डॉ. ज्ञानेश्वर टाले यांची वर्तणूक चांगली नाही, त्यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आगामी काळातील सण-उत्सव आणि निवडणुका पाहता कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडून कायदा व सु व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत कलम 56 (1)(अ )(ब )मुंबई पोलीस कायदा 1951 या कायद्याचा आधार घेत,मेहकरचे उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र जोगी यांनी डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना एका वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.बुलडाणा जिल्ह्यासह लगतच्या 6जिल्ह्यातुन तडीपार केले आहे.4 मार्च रोजी सदरचे आदेश पारित करण्यात आले.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दबावातून कारवाई : रविकांत तुपकर
डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर झालेली तडीपारीची कारवाई अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे.खरं तर हे प्रकरण तडीपारीमध्ये बसतच नाही.लोकसभा निवडणुकीतील वचपा काढण्यासाठी खा. प्रतापराव जाधव यांच्या राजकीय दबावातून मेहकर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.