नाचनवेल : कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील सर्वेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. या सिमेंट रस्त्यामुळे भाविकांची सोय होणार असल्यने डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी आमदार संजना जाधव यांचे आभार मानले आहे.

डोंगरगाव येथील सर्वेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली होती. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत धरुन दुचाकी वाहनाने प्रवास करावा लागत होता. ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु रस्त्याचे काम झाले नव्हते. आमदार संजना जाधव यांनी या रस्त्याच्या कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. आमदार संजना जाधव यांच्या आमदार निधीतून सर्वेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे.
आमदार संजना जाधव यांनी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी निधी उपलबध करुन दिल्याबद्ल ग्रामपंचायत सदस्य कैलास आग्रे, विजय आग्रे, राहुल आग्रे, सुनील आग्रे, दादाराव आग्रे, भाऊसाहेब आग्रे यांनी आभार मानले आहे. दरम्यान, आमदार संजना जाधव यांनी उर्वरित रस्त्याचे काम दुसऱ्या टप्यात पूर्ण करुन देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.