छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शहराच्या मुख्य बाजारपेठेसह विविध भागात हातगाडीवर पणत्या, दिवे, पुजेचे साहित्य, लहान मुलांचे कपडे विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली असून महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शहराच्या मुख्य बाजारपेठेसह विविध भागात हातगाडीवर पणत्या, दिवे, पुजेचे साहित्य, लहान मुलांचे कपडे विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली असून महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दिवाळी सणाच्या काळात हातगाडीचालकांवर कारवाई करु नये अशी मागणी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे अध्यक्ष ॲड. अभय टाकसाळ यांनी मंगळवार, 14 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत केली आहे.
वर्षातील सर्वात मोठा सण अशी ओळख असलेल्या दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून शहराच्या मुख्य बाजारपेठेसह विविध भागात हातगाड्यांवर दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, बोळके, दिवे, पुजेचे साहित्य, लहान मुलांचे कपडे तसेच इतर शोभीवंत साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. दिवाळी सणाच्या काळात महानगरपालिकेच्या वतीने हातगाडीवर व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे अध्यक्ष ॲड. अभय टाकसाळ यांनी केली आहे. तसेच हातगाडीचालकांवर कारवाई करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे महासचिव शक्तिमान घोष, उपाध्यक्ष मेकॅन्जी डाबरे, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष जम्मू आनंद, सेक्रेटरी विनिता बाळकुंद्री, मुंबई महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष अखिलेश गौड, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे सेक्रेटरी किरण राज पंडित, शेख इसाक शेख युनूस, शेख शकील, राजू हिवराळे, रफिक बक्ष, शेख अमजद शेख पाशु आदींची उपस्थिती होती.
