Chatrapati Sambhajinagar Crime News : मोबाइलवर तीनदा तलाक लिहून मेसेज पाठवत तलाक देणाऱ्या पतीविरोधात छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली.
छत्रपती संभाजीनगर : मोबाइलवर तीनदा तलाक लिहून मेसेज पाठवत तलाक देणाऱ्या पतीविरोधात छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली.
मोहम्मद अल्तमश, मोहम्मद फारुख खान, सासू फरीदा फारूख, सासरे मोहम्मद फारुख खान, ननंद अलिशा फारुख खान, दीर रेहान खान (रा. चणकापूर, जि. नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 22 एप्रिल 2022 ते आजपर्यंत सासरकडील मंडळींनी फिर्यादीचा वेळोवेळी त्रास दिला. पतीला व्यवसाय करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली. त्यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. शिविगाळ करून मारहाण केली. तर पतीने मोबाइलवरून तलाक.. तलाक…तलाक असा तीन वेळेस मेसेज पाठवून तलाक दिला. अशा फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहे.