सावळदबारा : शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सावळदबारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवार, 8 डिसेंबर रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना (उबाठा) पक्षाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी एकनाथ सपाटे, दिनकर शिपल्कर, शेषराव पाटील, समाधान नरोटे, प्रकाश गायकवाड, ताराचंद जाधव, गोपाल सपकाळ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एल. राठोड, बी.जी. गायकवाड, एम.डी. मुठाळ, ए.आर.चव्हाण, एस.सी. पाटील, जी.के. गवई यांच्यासह विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.