गाण्यावरून वाद, विवाहितेची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मेहुण्यावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर :  देवाची गाणे लावल्या कारणाने झालेल्या वादातून विवाहितेला झालेल्या माराणीचा अपमान सहन न झाल्याने तिने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. सिता युवराज तोरकड (रा. राजणगाव शे.पुं) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. हा प्रकार १२ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान राजणगाव शे.पुं येथे घडला.

 विवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मेव्हणा भगवान सैनाजी गिहे (२९ वर्ष), रा. राजणगाव शे.पुं) याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात मृत सिता यांचे  युवराज नागोजी तोरकड (३०, रा. लिंबी, पेडगाव ता.जि. हिंगोली ह.मु. राजणगाव शे.पुं) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहतात. १२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिता यांनी आपल्या घरी देवाची गाणी लावली होती. यावेळी शेजारी राहणारा मेव्हणा भगवान गिहे याने देवाचे गाणे का लावले? या कारणावरून सिताशी वाद घातला. वाद विकोपास गेला असता, भगवान गिहे याने सिता हिला पोटात लाथ मारली, तिचे केस ओढले व मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे १३ एप्रिल रोजी सिता घरासमोर बसलेली असताना पुन्हा भगवान गिहे याने तुझ्यात किती ताकद आहे ते मी पाहतो असे म्हणून सिताला पुन्हा मारहाण केली. या घटनेचा मानसिक धक्का बसलेल्या सिताने स्वतः च्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. प्ररकणात सिता यांनी नायब तहसीलदार यांच्यासमोर दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबावरून आरोपी भगवान गिहे याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »