गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात दिव्यांग शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू; भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथील घटना

भोकरदन :गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात दिव्यांग तरुणाचा पाझ्र तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार, 12 ऑक्टोबर रोजी भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे घडली. भाऊसाहेब बाबुराव जाधव, (55 वर्ष), रा. पळसखेडा बेचिराग ता. भोकरदन असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

सुरेश गिराम / भोकरदन :गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात दिव्यांग तरुणाचा पाझ्र तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार, 12 ऑक्टोबर रोजी भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे घडली. भाऊसाहेब बाबुराव जाधव, (55 वर्ष), रा. पळसखेडा बेचिराग ता. भोकरदन असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

भाऊसाहेब जाधव हे नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी आपल्याजवळील पाळीव जनावरे चरण्यासाठी शेतातील बांधावर सोडली होती. त्यावेळी एक गाय पाणी प्यायला गेली असता ती गाळात फसली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जावून गायीला हाकण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांचा तोल जावून ते जवळच्याच पाझर तलावात पडले होते. परंतु त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते पाण्यात गटांगळ्या खावून पाण्यात बुडाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे राईस कादरी,आपत्ती व्यवस्थापनचे सुनील दळवी, टेकाळे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाण्यातून भाऊसाहेब जाधव यांना बेशुध्दावस्थेत बाहेर काढून उपचारासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. भाऊसाहेब जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »