‘Devendra’ festival begins in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला 5 डिसेंबरपासून प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला 5 डिसेंबरपासून प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांचा हा शपथविधी सोहळा अतिशय भव्यदिव्य असा ठरला. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिवसेना आमदारांची मागणी मान्य करत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री
आज राज्यात सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी विविध खाती सांभाळली आहेत. त्यांनी राज्य, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. अजित पवारांनी पहिल्यांदा 1991 साली लोकसभा लढवली. पहिल्याच निवडणूकीत ते बारामतीतून थेट लोकसभेत निवडून गेले. तीन चार महिन्यातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर 1991 सालीच ते बारामतीतून आमदार म्हणून उभे राहिले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पायऱ्या चढले. त्यानंतर गेली 33 वर्षाहून अधिक काळ ते आमदार आहेत.