बुलढाणा : जिल्ह्यात एकूण ११ नगरपालिका असून, त्यापैकी १० पालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. न्यायालयीन अपील दाखल असल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली देऊळगाव राजा नगरपालिकेसाठी आज मतदान होत असून सकाळ पासून मतदानासाठी सुरुवात झाली आहे.

बुलढाणा : जिल्ह्यात एकूण ११ नगरपालिका असून, त्यापैकी १० पालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. न्यायालयीन अपील दाखल असल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली देऊळगाव राजा नगरपालिकेसाठी आज मतदान होत असून सकाळ पासून मतदानासाठी सुरुवात झाली आहे.याशिवाय,
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद आणि या चार नगरपरिषदांमधील काही प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आल्याने, त्यासाठीही मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन व पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
मतदान संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असून, आजच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान पहिल्या दोन तासात देऊळगाव राजा पालिका साठी ११.६९ टक्के मतदान झाले असून, सुरुवातीला अत्यल्प प्रतिसाद दिसून आला.
