वडोदरा : येथे खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीगच्या शेवटच्या लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सला ५ गडी राखून हरवले. या विजयासह दिल्लीने महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटरसाठी पात्रता मिळवली. दिल्लीच्या या विजयामुळे दोन वेळ चॅम्पियन असणारी मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर पडली. यूपी वॉरियर्स शेवटच्या स्थानावर राहिली. दिल्लीने ८ सामन्यांमध्ये ४ विजय आणि ४ पराभवांसह ८ गुण मिळवून लीग स्टेज तिसऱ्या स्थानावर संपवली. गुजरात जायंट्स दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पहिल्या स्थानावर राहून आधीच प्लेऑफमध्ये पोहोचल्या आहेत.

दिल्लीकडून मारिझान कॅपने ३ बळी घेतले. चिनेल हेन्री आणि श्री चरणीला प्रत्येकी २ बळी मिळाले, तर मिन्नू मणीने १ बळी घेतला. १२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात सामान्य राहिली. लिझेल ली १० आणि शेफाली वर्मा २९ धावा करून बाद झाल्या. यानंतर लॉरा वोल्व्हार्टने ४७ आणि कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने २६ धावांची खेळी केली. दिल्लीने १८.४ षटकांत लक्ष्य गाठून सामना जिंकला.
यूपीकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक २ बळी घेतले. शिखा पांडे, सोफी एकलस्टन, डिएंड्रा डॉटिन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
यूपीच्या केवळ १२२ धावा
प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्झ संघ २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १२२ धावाच करू शकला. संघातील कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा गाठता आला नाही. दीप्ती शर्माने २४, सिमरन शेखने २२ आणि शिखा पांडेने नाबाद २३ धावा केल्या.