Deepak Salampuria dies in accident : काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दिपक सलामपुरीया अपघातात ठार; गौण खनिज वाहतुक करणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले, शहरात हळहळ

Deepak Salampuria dies in accident

Deepak Salampuria dies in accident :दुकानातून बाहेर पडताच रस्ता ओलांडतांना अचानक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ओळख असलेले दिपक सलामपूरीया यांच्यावर काळाने अचानक घाला घातला.

Deepak Salampuria dies in accident

शेगाव : दुकानातून बाहेर पडताच रस्ता ओलांडतांना अचानक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ओळख असलेले दिपक सलामपूरीया यांच्यावर काळाने अचानक घाला घातला. गौण खनिजाची वाहतुक करणारे भरधाव टिप्परने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना 28 मार्च रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान मुरारका शाळेजवळ घडली. घटनेची माहिती संपूर्ण शेगावात वाऱ्यासारखी पसरली आणि दिपक सलामपूरीया यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने शहरात हळहळ व्यक्त होत होते.
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दिपक सलामपुरिया यांची बाळापुर रोड वर मुरारका हायस्कूल जवळ स्टेशनरी दुकान व सरकी ढेप चे दुकान आहे. 28 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ते दुकानावरून समोरच्याच खुल्या जागेत लघुशंकेसाठी गेले असता परत येताना रस्ता ओलांडताना बाळापूरकडून शेगाव शहरात येणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक करणारे भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक देऊन त्यांना चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. येथील नागरिकांनी त्यांना लगेच शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. दिपक सलामपूरीया हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांचा शहरात चांगलाच दांगडा जनसंपर्क होता. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन टिप्पर जप्त करून टिप्पर चालक लखिंदर गौप वय 36 यास ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »