Chhatrapati Sambhajinagar: सातारा परिसरातील विहिरीत पोहायला गेलेल्या चार मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज 12 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन विभाग दाखल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : येथील सातारा परिसरातील विहिरीत पोहायला गेलेल्या चार मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज 12 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन विभाग दाखल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात शिकायला आलेल्या आणि केटरिंगची कामे करणारे चार जण सातारा परिसरातील एका टेकडी जवळ असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेले. मात्र यात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
सचिन काळे (२८,रा.सातारा गाव), वैभव मोरे (२५,सटाणा जि.नाशिक) असे बुडून मयत झालेल्यांची नावे आहेत. यातील सचिन आणि अनिरुद्ध या दोघांना उत्तम पोहता येत होते. या दोघांवर विश्वास ठेवत वैभव हा थर्मकॉल बांधून विहिरीत उतरला. मात्र थर्मकॉल तुटल्याने तो बुडायला लागला. त्याला वाचवायला गेलेल्या सचिनचा ही दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.