मुलीचे लग्न दोन महिन्यांवर; शेतकरी वडिलांची आत्महत्या : बँकेचे कर्ज व कौटुंबिक अडचणींमुळे टोकाचा निर्णय 

मालेगाव : तालुक्यातील  अमानी येथील युवा शेतकरी मदन ज्ञानबा खडसे (वय ४५) यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमानी गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गट क्रमांक ३४६ मधील शेतात जाऊन मदन खडसे यांनी विषारी औषध प्राशन केले. सकाळी त्यांचा मुलगा शेतात पाहण्यासाठी गेला असता वडील विषारी औषध घेतलेल्या अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यानंतर ही बाब गावात कळविण्यात आली. दरम्यान, खडसे यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याची तसेच आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याची चर्चा असून त्यांच्या मुलीचे लग्न अवघ्या दोन महिन्यांवर आले होते. त्यांच्या पश्चात अपंग आई-वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच संबंधित तलाठ्यांनीही घटनेचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »