dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कंटेनरला धडकून दुचाकीस्वार तरुण ठार

करमाड :  कंपनीतील शिफ्ट उरकून दुचाकीने घरी परतत असताना समोर जात असलेल्या कंटेनरला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 8 मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील सटाणा फाटा येथे घडला. 

करमाड :  कंपनीतील शिफ्ट उरकून दुचाकीने घरी परतत असताना समोर जात असलेल्या कंटेनरला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 8 मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील सटाणा फाटा येथे घडला. सजन सुगनलाल बिमरोड (३५ वर्ष), रा. नागोणीची वाडी, ता. छत्रपती संभाजीनगर असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सजन बिमरोड हे शेंद्रा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला होते. रविवारी दिवसभर कंपनीत काम केल्यावर ते दुचाकीवर जालना रोडने घराकडे परतत होते. करमाडजवळील सटाणा फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीसमोर जात असलेला कंटेनर त्यांच्या लक्षात न आल्याने दुचाकी कंटेनरला जावून पाठीमागून धडकली. या अपघातात सजन बिमरोड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते घटनास्थळी बेशुध्द पडले होते. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोलिस अंमलदार संतोष चव्हाण, श्याम ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या सजन बिमरोड यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुणालयात दाखल केले. सजन बिमरोड यांच्यावर उपचार सुरु असतांना रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top