Crime news in Chhatrapati Sambhajinagar: किरकोळ कारणावरुन पोलीस अंमलदारास फायटरने मारहाण

Crime news in Chhatrapati Sambhajinagar

Crime news in Chhatrapati Sambhajinagar: किरकोळ कारणावरुन गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारास फायटरने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime news in Chhatrapati Sambhajinagar
Crime news in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : किरकोळ कारणावरुन गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारास फायटरने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पोलीस अंमलदार काकासाहेब कौतिकराव आधाने (34, कोलठाण) हे जळगाव रोडने जात असताना अज्ञात आरोपीने त्याच्या ताब्यातील गाडी क्रमांक एमएच-20- एफपी 2823 ही पोलीस अंमलदार आधाने यांच्या गाडीच्या पुढे घेण्याच्या कारणावरुन वाद केला. आरोपीने फिर्यादीच्या गाडीपुढे त्याची कार आडवी लावत शिवीगाळ करुन पोलीस अंमलदारास फायटरने मारहाण करुन जखमी केले. यावेळी पोलीस अंमलदार आधाने यांनी त्याचा प्रतिकार केला असता आरोपीने फिर्यादीचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »