Crime News in Chhatrapati Sambhajinagar: अल्पवयीन मुलीस काढले शोधून; आरोपी ताब्यात

Accused in custody

Crime News in Chhatrapati Sambhajinagar: अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन मुलीला शोधून काढण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला एका वर्षानंतर यश आले.

Accused in custody
Accused in custody

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन मुलीला शोधून काढण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला एका वर्षानंतर यश आले.
नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंब वाळुज एमआयडीसीमध्ये कंपनीत कामासाठी आले होते. बजाजनगर परिसरात भाड्याने रुम घेऊन ते राहत होते. तक्रारदार आणि त्यांची पत्नी दोघेही कंपनीत काम करत असतानाच मागील वर्षी पाच जानेवारी 2023 रोजी त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या लहान भावासह बाहेरुन जाऊ येते म्हणून घरातून निघून गेली. तेव्हापासून ती परत आलीच नाही. याप्रकरणी तक्रारदार वडिलांनी त्यांच्या अल्पवीयन मुलीस कोणीतरी अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार वाळुज एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार, पोलीस उपनिरीक्षक इसाक पठाण, डी.डी. खरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.

एक वर्ष तपास करुनही नाही लागला मुलीचा शोध

गुन्हा दाखल झाल्यापासून वाळुज एमआयडीसी पोलिसांना एक वर्ष तपास करुनही गुन्ह्यातील अपहरीत मुलगी आणि आरोपीचा शोध लावता आला नाही. त्यामुळे हा गुन्हा 21 फेब्रुवारी रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर सगळी सूत्रे हलली.

असा लावला आरोपी आणि अल्पवयीन मुलीचा शोध

गुन्हा कक्षाकडे वर्ग केल्यानंतर कक्षाच्या तपास पथकाने बारकाईन आणि सखोल तपास सुरू केला. गुन्ह्यातील अपहरीत मुलगी आणि आरोपी हे वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने मानोरा येथे जावून गुन्ह्यातील अपहरीत मुलीस शोधून काढले. तर आरोपी विजय उत्तम आदेराव यास ताब्यात घेऊन वाळुज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »