जालना : जालना शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असून शालार्थ समन्वयक पदावर शिक्षकांना कार्य करता येत नाही. यात शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ,गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे आणि शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी जवळपास 1 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांना निलंबित करा, अशा मागणीचे फलक गळ्यात लटकवून एका तरुणाने जिल्हा परिषदेत शुक्रवारी लक्षवेधी आंदोलन केले.

जालना : जालना शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असून शालार्थ समन्वयक पदावर शिक्षकांना कार्य करता येत नाही. यात शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ,गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे आणि शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी जवळपास 1 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांना निलंबित करा, अशा मागणीचे फलक गळ्यात लटकवून एका तरुणाने जिल्हा परिषदेत शुक्रवारी लक्षवेधी आंदोलन केले.
नारायण लोखंडे असे आंदोलन करणार्या तरुणाचे नाव आहे. यापुर्वी लोखंडे यांनी अनेक आंदोलने केली आहेत. विभागीय आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यात शिक्षणाधिकारी अनेक चौकशांमध्ये दोषी आढळले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात आणि शालार्थ समम्वयक, गट शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी नारायण लोखंडे यांनी जिल्हा परिषदेसमोर हे अनोखे आंदोलन केले . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी निवेदन स्वीकारून कारवाईचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

काय आहे निवेदनात ?
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उघड होत आहे. शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ गैरप्रकार, अनियमतता करीत आहे. शालार्थ समन्वयक या पदावर शिक्षकांना कार्य करता येत नाही. यासाठी आम्ही अनेक आंदोलने, उपोषणे केलेले आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी 19 ऑगस्ट 2024 रोजी शालार्थ समन्वयक म्हणून काम करणाऱ्या 10 शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करून त्यांना मूळ पद स्थापनेवर पाठविण्याचे आदेश दिले होते. दोषी असणारे कर्मचारी, अधिकारी यांना निलंबीत करून शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची देखाल 1 ते 4 चौकशी आदेश दिलेले होते. शिक्षणाधिकारी अनेक चौकश्यामध्ये दोषी आढळलेले आहेत. आयुक्त आणि सिइओ यांनी शिक्षकांना मूळ पदस्थापनेवर रुजू होण्याचे आदेश देऊन देखील शिक्षक शालार्थ समन्वयक पदावर अद्यापही कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. परतूर येथे शालार्थ समन्वयक म्हणून काम पाहणारे चंद्रकांत पौळ यांनी 1 कोटी 34 लाख रु शासनाचे पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग करून मोठा गैरप्रकार केला आहे. याला जबाबदार गट शिक्षणाधिकारी साबळे व वरिष्टांनी आदेश देऊनही कामात हलग्रजीपणा करणारे कैलास दातखीळ यात जबाबदार आहे. या तिघांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करू, असा इशारा देण्यात आला आहे.